विना परवाना पिस्टल बाळगणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेने केले अटक; एक पिस्टल व दोन जिवंत काडतुसे जप्त

मिरज, ता.१४: मिरज- म्हैशाळ रोड टोल नाक्याजवळ विनापरवाना पिस्टल बाळगून फिरणाऱ्यास सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केले अटक. त्याच्या कब्जातून एक पिस्टल व दोन जिवंत काडतुसे हस्तगत केले. अटक केलेल्या संसायिताचे नाव फिरोज सलीम शेख, वय १९ वर्षे, रा बिसमिल्लाह कॉलनी, म्हैसाळ रोड, मिरज असे आहे. त्याच्यावर मिरज शहर पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांची अधिक माहितीनुसार विना परवाना पिस्टल बाळगून फिरणाऱ्या संसयिताचा शोध लावून त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/ सतीश शिंदे यांनी सपोनि/ नितीन सावंत व त्यांचा पथकाला दिली. पथकातील यांचे पथकातील पोलीस अमोल ऐदाळे व अनंत कुडाळकर यांना गोपनिय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मिरज ते म्हैसाळ रोडवरील टोल नाक्याजवळ एक इसम पिस्टल कब्जात बाळगून फिरत आहे. मिळालेल्या माहितीने नमूद पथकाने सापळा रचून संशयीतास ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कब्जात एक देशी बनावटीचे गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतुसे मिळून आली. त्याच्याजवळ पिस्टल बाळगण्याचा परवाना नसल्याने त्याच्याकडील पिस्टल व काडतुसे जप्त केले. पुढील तपासकमी पिस्टल, काडतुसे आणि संशयीतास मिरज शहर पोलीसांत ताब्यात देण्यात आले. या पुढील अधिक तपास मिरज शहर पोलीस करीत आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button