जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या 61 गटांसाठी आरक्षण सोडत जाहीर

सांगली, ता.१३ : सांगली जिल्हा परिषदेच्या ६१ गटांसाठी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली आज नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व महिला (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातील व सर्वसाधारण महिलांसह) आरक्षण सोडत काढण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली येथील जिल्हा नियोजन समिती सभागृहात पार पडलेल्या या आरक्षण सोडतीस उपजिल्हाधिकारी (महसूल) राजीव शिंदे, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) अजय पवार, तहसीलदार (सर्वसाधारण) लीना खरात आदि उपस्थित होते.

राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांच्याकडून जिल्हा परिषद व पंचायत समित्या सार्वत्रिक निवडणूक- २०२५साठी आरक्षण सोडत कार्यक्रम प्राप्त झाला आहे.

सोडतीनुसार गटनिहाय आरक्षण, निवडणूक विभागाचा क्रमांक व नाव अनुक्रमे पुढीलप्रमाणे –

महिला सर्वसाधारण – ४६ येलूर, ४८ वाकुर्डे बुद्रुक, ५ जाडरबोबलाद, ५३ आरग, २० वांगी, १४ नागनाथनगर नागेवाडी, १२ डफळापूर, ४७ पणुंब्रे तर्फे वारूण, ७ संख, १६ करंजे, ३ निंबवडे, ३८ कासेगाव, ३९ वाटेगाव, १५ लेंगरे, ४५ बागणी, ३० देशिंग, ३३ दुधोंडी, ५२ एरंडोली, ३६ रेठरे हरणाक्ष

महिला नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग – २१ देवराष्ट्रे, ४० पेठ, १३ बिळूर, ३७ बोरगाव, १९ कडेपूर, ५७ बुधगाव, ५९ कवठेपिरान, १८ तडसर,

महिला अनुसूचित जाती प्रवर्ग – ६२ म्हैसाळ (एस), ५५ मालगाव, ५६ कवलापूर, ५४ बेडग

सर्वसाधारण – १० बनाळी, ५८ कसबे डिग्रज,४ खरसुंडी, २२ मांजर्डे, ५० मांगले, २६ चिंचणी, २ करगणी, ३२ कुंडल, ५२ भोसे, ३५ भिलवडी, २५ येळावी, ४४ बावची, ८ दरिबडची, १७ भाळवणी, ४२ कामेरी, ४९ कोकरूड, २४ विसापूर, ४३ चिकुर्डे, २७ मणेराजुरी,

नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग – ११ शेगाव, १ दिघंची, ९ मुचंडी, २९ कुची, २८ ढालगाव, ४१ वाळवा, ३४ अंकलखोप, ६० समडोळी.

अनुसूचित जाती प्रवर्ग – ३१ रांजणी, ६ उमदी, २३ सावळज

दहा पंचायत समितीच्या १२२ निर्वाचक गणांसाठी संबंधित तहसिलदार यांच्यास्तरावर आरक्षण सोडत काढण्यात आली.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button