
उपायुक्त स्मृती पाटील यांच्या हस्ते बेघर बांधवांना गुलाबपुष्प व नाष्टा वाटप
सांगली: सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीने चालवण्यात येत असलेल्या ‘सावली निवारा केंद्र’ (सांगली) आणि ‘आस्था निवारा केंद्र’ (मिरज) येथे आज जागतिक बेघर दिन साजरा करण्यात आला. बेघर बांधवांना आधार आणि दिलासा देण्यासाठी आयोजित या कार्यक्रमात शहर कार्यक्रम अधिकारी तथा उपायुक्त श्रीमती स्मृती पाटील यांच्या हस्ते सावली बेघर निवारा केंद्रातील बेघर बांधवांना गुलाबपुष्प देऊन व नाष्टा वाटप करून बेघर दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. बेघर बांधवांप्रति सहानुभूती व्यक्त करण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमास माजी नगरसेविका श्रीमती वर्षा निंबाळकर, राष्ट्रीय नागरी उपजीविका केंद्राच्या (NULM) व्यवस्थापक श्रीमती ज्योती सरवदे, मतीन अमीन, किरण पाटील, राजेंद्र हंकारे, संपदा मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी सावली बेघर केंद्राचे व्यवस्थापक मुस्तफा मुजावर, मिरज आस्था केंद्राच्या व्यवस्थापक सुरेखा शेख, सेवासदनच्या मिनाक्षी कोळी, रफिक मुजावर आणि वंदना काळेल आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक श्रीमती ज्योती सरवदे यांनी केले, तर आभार दीपक चव्हाण यांनी मानले.