
सांगली, ता.११ : एका ग्रामविकास अधिकारी यांनी केलेल्या विकासकामाची चर्चा सर्वत्र होत आहे. भिलवडी व नांद्रे येथे आपली सेवा बाजावत असलेले ग्रामपंचायत अधिकारी सचिन महिंद-पाटील यांनी केलेल्या विकासकामामुळे त्यांचे नाव चर्चेत येत आहे. सचिन पाटील यांनी ज्या-ज्या ग्रामपंचायत आपली सेवा बजावली आहेत. त्या-त्या गावचा सर्वांगीण विकास केला आहे. सचिन पाटील यांनी कुंडल भिलवडी-स्टेशन, बामणोळी, कवलापूर, जानराववाडी, या गावात विकास कामाचा छाप उठवला आहे.
सचिन पाटील यांनी केलेल्या कामाची दखल घेऊन प्रशासनांने २०११-२०१२ सालाचा व २०११-२०१२ सालचा आदर्श ग्रामसेवक पुसस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.
नांद्रे येथे पंचायत राज अभियान राबविण्याचा मानस आहे. काही दिवसापूर्वी जिल्हाधिकारी अशोक काकडे व प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांनी नांद्रे गावास भेट देऊन पहाणी केली. त्यावरून नांद्रे हे गाव जिल्ह्यात अव्वल ठरेल, असा अंदाज व्यक्त होत आहे.
सचिन पाटील यांची काम करण्याची पद्धत वेगळीच आहे. त्यांनी केलेल्या या विकास कामाची सर्वत्र चर्चा होत आहे. एक कामाचा माणूस म्हणून त्यांच्याकडे प्रशासनातील अधिकारी आदराने पाहत आहेत.