बेळंकी ग्रामपंचायतीत झालेल्या कोट्यावधी रुपयाचा अनिमित्तते बाबत तानाजी जाधव व ग्रामस्थांकडून चौकशीची मागणी

मिरज तालुक्यातील बेळंकी येथील ग्रामपंचायत मध्ये कोट्यावधी रुपयांचा अनेक कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकरणी विभागीय आयुक्त सांगली जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन चौकशी करण्याचे मागणी करण्यात आलेली आहे. ग्रामपंचायत येथील सरपंच बांधकाम परवाना बोगस पद्धतीने दिला आहे. स्मशानभूमी अंतर्गत गटारी पंधरावा वित्त आयोग ग्रामनिधी टेंडर प्रक्रियेमध्ये अनेक कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमित्तता व भ्रष्टाचार झाला आहे. याप्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

याप्रकरणी सखोल चौकशी न केल्यास सोमवारपासून पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याची निवेदनामध्ये म्हटले आहे. प्रशासन या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी ग्रामपंचायत येथील सरपंच यांच्यावर ग्रामपंचायत नियम 39 अंतर्गत कारवाई करण्याचे मागणी करण्यात आलेली आहे. जण सुविधा, नागरी सुविधा अनेक कामांमध्ये घोटाळा केला असून याप्रकरणी सखोल चौकशी करावी अन्यथा सोमवारपासून सोमवारपासून पंचायत समिती कार्यालय समोर आमरण उपोषण करणार असल्याचे माहिती तानाजी जाधव यांनी दिली. यावेळी रवींद्र गायकवाड, विजयकुमार गायकवाड, संजय माने
संजू दादा गायकवाड, सुजित इनामदार, रामचंद्र गायकवाड, भीमराव गायकवाड, अरविंद गायकवाड, अशोक बेंदरकर यांनी दिली आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button