बनावट नोटांच्या साठ्यासह एकूण १ कोटी ११ ०६,१००/- रु. चा मुद्देमाल जप्त

मिरज, ता.१०: आगामी निवडणुकांचा पार्श्वभूमीवर मिरज महात्मा गांधी पोलिसांची धडकेबाज कारवाई. या कारवाईत बनावट नोटांचे उत्पादन छपाई व साठा करणारे आंतरजिल्हा टोळतील पाच संशयितांना महात्मा गांधी पोलिसांनी गजाआड केले.
कोल्हापूर येथील कंपनीवर कारवाई करुन बनावट नोटांच्या साठ्यासह विना नंबरप्लेट एक इनोव्हा चारचाकी असा एकूण १,११,०६,१००/- रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सुप्रीत काडाप्पा देसाई, वय २२, रा. गडहिंग्लज जि. कोल्हापूर, राहुल राजाराम जाधय, वय ३३, रा. लोकमान्य नगर, कोरोची, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर, इब्रार आदम इनामदार, वय ४४, रा. विश्वकर्मा अपार्टमेंट, कसबा बावड जि. कोल्हापूर, नरेंद्र जगनाथ शिंदे, वय ४०, रा. वनश्री अपार्टमेंट, टाकळा, राजारामपुरी, कोल्हापूर, सिध्देश जगदीश म्हात्रे वय २८, रा. रिध्द गार्डन, ए.के. वैद्य मार्ग, मालाड (पूर्व मुंबई) असे अटक केलेल्या पाच संशयितांची नावे आहेत.
पोलीसांची अधिक माहिती अशी की, बुधवार (ता.८) रोजी महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संदीप शिंदे यांना गोपनीय खात्रीशीर माहिती मिळाली की, सुप्रीत देसाई हा बनावट नोटा घेऊन निलजी-बामणी रोड, कोल्हापूर ब्रिज, मिरज येथे आला आहे. सपोनि / संदीप शिंदे यांनी तात्काल पोलीस उपनिरीक्षक रुपाली गायकवाड व त्यांचा पथकाला छापा टाकून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलीस उपनिरीक्षक रुपाली गायकयाह यांचे नेतृत्वाखाली पथकाने नमूद ठिकाणी सापळा रचून संशयीतरीत्या वावरत असलेल्या सुप्रीत देसाई त्याची अंगझडती केली असता त्याच्या पँटच्या खिशातून पाचशे रुपये चलनाचा बेचाळीस हजार रुपये किंमतीच्या ८४ बनावट मिळून आल्या. संसायितास ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला. पोलिसांच्या अधिक चौकशीत सदरच्या बनावट नोटा ह्या संशयीत आरोपी राहूल राजाराम जाधव हा तयार करीत असून त्याच्या जवळून ह्या नोटा सुप्रीत देसाई, इब्राम इमानदार, नरेंद्र शिंदे हे महाराष्ट्र राज्यात विविध भागात वितरित करीत निष्पन्न झाले. नमूद पथकाने छपाई करणारा संशयीत आरोपी राहुल राजाराम जाधव याचा शोध घेऊन कोल्हापूर मुख्य मार्केट परिसरातील रुईकर कॉलनी येथील बनावट नोटा तयार करणाऱ्या कंपनीच्या ऑफिसमधून ताब्यात कंपनीतून पाचशे रुपये चलनाचा ३४ हजार रुपयांच्या ६८ बनावट नोटा, बनावट नोटा छपाईचे साहित्य लॅपटॉप, प्रिंटर असे १ लाख ७ हजार ६०० रुपयांचे मिळून आले. सदर संशयीत राहुल व सुप्रीत याला गुन्ह्याच्या तपासकामी ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असते. न्यायालयाने शनिवार (ता.११) रोजी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. कोठडीत संशयीत चौकशीत अन्य दोघे संसीयतांची माहिती घेवून इब्रार इमानदार व नरेंद्र शिंदे यांना पुणे-बेंगलोर हायवे वरील पेठनाका ते कासेगाव येथे ताब्यात घेतले. त्यांच्याकडून विना नंबरप्लेट एक इनोव्हा चार चाकीत ५०० रुपये चलनाच्या ९७ लाख ६७ हजार ५०० रुपयांचे १९ हजार ५३५ रुपयांचा बनावट नोटा, २०० रुपये चलनाच्या ८५ हजार ८०० रुपयांच्या ४२९ बनावट नोटा मिळून आल्या. त्यांच्यासोबत असणारा सिद्धेश म्हात्रेला ताब्यात घेऊन बनावट नोटा विना नंबरप्लेट इनोव्हा चारचाकी व लॅपटॉप आणि साहित्य असा हा एकूण १ कोटी ९ लाख ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या गुन्ह्यातील राहुल राजाराम जाधव परराज्यात ही गुन्हा असून तो सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले. या पुढील अधिक तपास महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संदीप शिंदे हे करीत आहे.
महात्मा गांधी पोलिसांचे आवाहन
महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरज कडून महाराष्ट्र राज्यात आगामी काळात पार पड़ष्णा-या स्थानिक स्वराज्य संस्था व महानगरपालीका यांच्या निवडणुक अनुषंगाने चनावट नोटांचे उत्पादन, छपाई, साठा, विक्री तसेच वितरण करून भारतीय अर्थव्यवस्था खिळखिळी करणा-या व्यवस्थेची पाळेमुळे खणून काढणेच्या अनुषंगाने सदरचे कारवाईत सातत्य राखून जास्तीत जास्त प्रभावी कायदेशीर कारवाई करुन सदर अवैध व्यवसायाचा समुळ बीमोड करण्याच्या उपाययोजना राबविण्यात येत असून नागरीकांनी अशा अवैध व्यवसायाची माहीती पोलीस प्रशासनास देण्याचे महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेतर्फे आवाहन करण्यात येत आहे.