महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीला वेग! अंतिम प्रभाग रचनेला राज्य निवडणूक आयोगाची अधिकृत मान्यता

सांगली, ता.८: सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक-२०२५ च्या दिशेने अत्यंत महत्त्वाचे पाऊल पडले आहे. शहराच्या आगामी निवडणुकीसाठीच्या अंतिम प्रभाग रचनेला राज्य निवडणूक आयोगाने आज अधिकृत मान्यता दिली आहे. महापालिका आयुक्त, सत्यम गांधी यांनी या महत्त्वपूर्ण निर्णयाची माहिती देताना स्पष्ट केले की, नगर विकास विभागाने सादर केलेला प्रस्ताव आणि प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या शिफारशींचा सखोल विचार करून आयोगाने ही मान्यता दिली आहे.


नगर विकास विभागाने नेमून दिलेल्या वेळापत्रकानुसार ही अंतिम प्रभाग रचना महापालिकेच्या विभागीय क्षेत्रीय कार्यालय क्र. १, २, ३ व ४ येथे लवकरच नागरिकांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्याची कार्यवाही तातडीने करण्यात येणार आहे.

आयुक्त सत्यम गांधी यांनी

अंतिम प्रभाग रचनेस मान्यता मिळाल्याने निवडणुकीच्या तयारीला आता अधिक गती प्राप्त झाली आहे. यामुळे मतदार आणि संभाव्य उमेदवारांना निवडणुकीच्या दृष्टीने आवश्यक माहिती उपलब्ध होणार आहे.

उपायुक्त (सामान्य प्रशासन), अश्विनी पाटील

निवडणुकीच्या पुढील टप्प्यांची कार्यवाही निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू होईल

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button