महानगरपालिकेची विनापरवाना फलक, बॅनर्स, झेंडे, पताके हटवण्याची विशेष मोहीम

सांगली, ता.८ : सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील शहर सौंदर्य आणि सुव्यवस्था राखण्यासाठी महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांच्या आदेशानुसार, विनापरवाना लावण्यात आलेले जाहिरात फलक, बॅनर्स, झेंडे, पताके आणि इतर प्रचार साहित्य काढून टाकण्याची विशेष मोहीम तीव्र करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत आज बुधवार (ता.८) क्षेत्रीय कार्यालय क्र. १ व क्र. २ च्या हद्दीतील शामरावनगर, गणेशनगर आणि रमामातानगर या प्रमुख परिसरांवर अतिक्रमण विभागाने विशेष लक्ष केंद्रित केले. यावेळी अनधिकृतपणे लावण्यात आलेले फलक, बॅनर्स, झेंडे आणि पताके जप्त करून काढण्यात आले.
या कारवाईदरम्यान अतिक्रमण अधिक्षक तथा सहायक आयुक्त क्षेत्रीय कार्यालय क्र. २, नागाअर्जुन मद्रासी हे उपस्थित होते.

नागरिकांना तातडीचे आवाहन
महानगरपालिकेच्या वतीने सर्व नागरिक, व्यापारी आणि संस्थांना कळविण्यात येते की, त्यांनी परवानगीशिवाय सार्वजनिक ठिकाणी लावलेले सर्व फलक, झेंडे आणि बॅनर्स त्वरित, स्वयंस्फूर्तीने काढून टाकावेत.
या आवाहनाचे पालन न केल्यास, महानगरपालिका संबंधितांवर दंडात्मक तसेच प्रशासकीय कारवाई करेल.
शहर स्वच्छ, सुंदर आणि सुव्यवस्थित ठेवण्यासाठी नागरिकांनी महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button