आक्षेपार्ह वक्तव्यवरून मिरजेत दोन गटात राडा; तणाव नियंत्रणात

पोलिसांनी जमावाला पांगवले; एक जण ताब्यात; अफवा पसरवणाऱ्यांची गय नाही; अधीक्षक घुगे यांचा इशारा

मिरज, ता.८ : येथे आक्षेपार्ह वक्तव्यवरून दोन गटात राडा झाला. संतप्त झालेल्या जमावाकडून संशयताच्या घरावर तुफान दगडफेक करण्यात आली. यानंतर मिरज शहरातील दुकाने बंद करण्यात आले. पोलिसांनी आपली खाकी दाखवत जमावाला पांगवले. तणावपूर्ण परिस्थिती मुळे मोठा पोलिस फौज फाटा तैनात करण्यात आला आहे.

घटनास्थळावरून मिळालेली माहितीनुसार मिरज शहरातील नदीवेस परिसरातील एका गल्लीत दोन समाजातील एकमेकांच्या ओळखीचे तरुण मंगळवारी (ता.७) रात्री बोलत बसले होते. दोघांमध्ये एकमेकांच्या समाजाविषयी द्वेष निर्माण करणारे वक्तव्य करण्यात आले. यानंतर एका गटाकडून संबंधित तरुणास बेदम मारहाण करण्यात आली. संबंधित तरुणावर कारवाई करावी, अशी मागणी करत एक गट मिरज शहर पोलीस ठाण्यात जमला. पोलिसांनी संबंधित तरुणाला ताब्यात घेऊन कारवाई करण्याचे आश्वासन दिले. परंतु त्यानंतर संतप्त झालेला जमाव संबंधित तरुणाच्या घराजवळ गेला. त्यानंतर त्याच्या घरासमोर जमाव जमला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जमावाला शांत करण्याचा प्रयत्न यावेळी पोलिसांकडून करण्यात आला संतप्त जमावाने राजकीय नेत्यांचे पोस्टर फाडले व काहीजण पोलिसांच्या अंगावर धावण्याचा प्रकार केल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी जमावावर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. या घटनेमुळे मात्र मिरजेत एकच गोंधळ निर्माण झाला. मिरज शहर, महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरज ग्रामीण या पोलिस ठाण्यांचा फौज फाट्यासह दंगल नियंत्रण पथकाचा मोठा फौज फाटा मिरजत तैनात करण्यात आला आहे.

मिरज शहरामध्ये दोन तरुण मुलांमध्ये वादाचा प्रकार घडला त्यानंतर जातीय रंग लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु परिस्थिती नियंत्रणात आहे. संशयीतांना ताब्यात घेण्यात आलेला आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. अफवा पसरणाऱ्यांची गाय करणार नाही.
पोलीस अधीक्षक संदीप घुगे .

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button