
महाराष्ट्र, ता.३: कागदी बाँडची गरज संपणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा महत्त्वाचा निर्णय आजपासून महाराष्ट्रात इलेक्ट्रॉनिक बाँडची सुरवात. यामुळे आयातदार व निर्यातदारांना मोठा दिलासा. कस्टम अधिकाऱ्यांकडून तत्काळ पडताळणीमुळे फसवणुकीस ही आळा बसणार आहे. आधीच्या बॉण्डमध्ये इलेक्ट्रॉनिक पद्धतीने बदल किंवा रक्कम वाढ करणे होणार शक्य. कस्टम अधिकारी व ग्राहकांच्या ई स्वाक्षरीमुळे व्यवहार अधिक सुरक्षित व पारदर्शक होणार