मनपाची कारवाई; सिंगल यूज प्लास्टिकचा साठा व वापर करणाऱ्या १३ व्यावसायिकांवर २६,००० रुपयांचा दंड

मिरज, ता.४: सिंगल यूज प्लास्टिक व सार्वजनिक स्वच्छता नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मनपा कारवाई करत आहे. विभागीय कार्यालय क्र. ४, मिरज – वॉर्ड क्रमांक ३, ४, ५, ६ आणि २० या व्यापारी क्षेत्रात सिंगल यूज प्लास्टिक तपासणी मोहीमेत सिंगल यूज प्लास्टिकचा साठा व वापर करणाऱ्या १३ व्यावसायिकांवर प्रत्येकी २,००० प्रमाणे एकूण २६,००० दंड आकारण्यात आला. तसेच सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकनाऱ्या एका व्यावसायिकावर ७,००० दंड असा ह्या दोन्ही कारवाईत एकूण ३३,००० इतका दंड वसूल करण्यात आला आहे. सदर कारवाई आयुक्त सत्यम गांधी यांच्या आदेशाने व अतिरिक्त आयुक्त तसेच मा. उपायुक्त (आरोग्य व स्वच्छता) यांच्या नियंत्रणाखाली मुख्य स्वच्छता अधिकारी सचिन सागावकर, स्वच्छता अधिकारी याकुब मद्रासी अतुल आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून यात स्वच्छता निरीक्षक अक्षय कोलप, नितीन कांबळे, सचिन वाघमोडे, पंकज घनके आणि महेश कांबळे यांनी सक्रिय सहभाग घेतला.

व्यापारी व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, सिंगल यूज प्लास्टिकचा वापर टाळावा, सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकता स्वच्छतेस सहकार्य करावे आणि “स्वच्छ शहर सुंदर शहर” या अभियानात सहभागी व्हावे. सांगली,मिरज,कुपवाड महानगरपालिका

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button