सिंगल यूज प्लास्टिक व सार्वजनिक स्वच्छता नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मनपाची कारवाई

सांगली, ता.३ : सिंगल यूज प्लास्टिक व सार्वजनिक स्वच्छता नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मनपाची कारवाई. आयुक्त तथा प्रशासक यांच्या आदेशाने व अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त (आरोग्य व स्वछता),मुख्य स्वच्छता अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग समिती क्रमांक ३, कुपवाड वॉर्ड क्रमांक १, २, ८ व ९ या व्यापारी क्षेत्रात गेल्या दोन दिवसांत विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. या तपासणीदरम्यान सिंगल यूज प्लास्टिकचा साठा व वापर आढळून आलेल्या १० व्यावसायिकांवर प्रत्येकी ५,००० रुपये प्रमाणे एकूण ५०,००० रुपये इतका दंड आकारण्यात आला. तसेच सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्याबद्दल एका व्यावसायिकावर ३,००० रुपयांचा दंड करण्यात आला. असा एकूण ५३,००० रुपयांचा दंड या मोहिमेत वसूल करण्यात आला आहे. सदर कारवाई स्वच्छता निरीक्षक सिद्धांत ठोकळे, विकास कांबळे, गणेश धोतरे, अंजली कुदळे तसेच मुकादम प्रकाश चव्हाण व संजय ऐवळे यांनी केली.

महानगरपालिकेच्या वतीने नागरिक व व्यावसायिकांना आवाहन करण्यात आले आहे की, सिंगल यूज प्लास्टिकचा वापर टाळावा, स्वच्छता नियमांचे पालन करावे व स्वच्छ शहर अभियानात सहकार्य करावे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button