
सांगली, ता.२: केंद्र शासन पुरस्कृत पी.एम.ई. बस सेवा योजने अंतर्गत सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिकेच्या मिरज येथील नियोजित बस डेपोवर सुरू असलेल्या स्थापत्य व विद्युतिकरण कामांची पाहणी आयुक्त तथा प्रशासक श्री. सत्यम गांधी यांनी बुधवारी०१ ऑक्टोबर रोजी केली. या पाहणीदरम्यान आयुक्तांनी सद्यस्थितीचा आढावा घेतला तसेच काम गतीने व दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचनाही संबंधित विभागांना दिल्या.
यावेळी मा. अतिरिक्त आयुक्त रोकडे, उपायुक्त सौ. स्मृती पाटील, शहर अभियंता चव्हाण, नगररचनाकार, गायकवाड, कार्यकारी अभियंता (विद्युत) चव्हाण, प्र. कार्यकारी अभियंता विनायक जाधव, उपअभियंता महेश मदने, बांधकाम व नगररचना विभागातील अभियंते, संबंधित मक्तेदार तसेच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण विभागाचे कार्यकारी अभियंता मेहता उपस्थित होते.