“प्रशासन अधिक सक्षम – पदोन्नतीनंतर खात्यांचे वाटप व अतिरिक्त जबाबदाऱ्या निश्चित”

सांगली, ता.२: सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिकेचा आकृतीबंध व सेवा (सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण) नियम, २०२३ मा. शासनामार्फत मंजूर करण्यात आले असून, या नियमांनुसार नोव्हेंबर २०२५ अखेरपर्यंत ३०७ कर्मचाऱ्यांची पदोन्नती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. तसेच, पाच वर्षांपेक्षा अधिक कालावधी पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांची १९ सप्टेंबर २०२५ रोजी बदली आदेशाद्वारे विविध विभागात पदस्थापना करण्यात आली आहे. नवीन आकृतीबंधानुसार अनेक प्रमुख पदे अद्याप रिक्त असल्यामुळे, प्रशासकीय गरज लक्षात घेऊन ज्या ठिकाणी अधिकारी/कर्मचारी उपलब्ध नाहीत तेथे संबंधित पदाला लगतच्या किंवा निम्न संवर्गातील अनुभवी व कार्यक्षम अधिकाऱ्यांना विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख या स्वरूपात अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.

सदर सर्व विभागांचे नियंत्रण अधिकारी, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख यांची आढावा बैठक १ ऑक्टोबर रोजी कै. राजाभाऊ जगदाळे सभागृह (मुख्यालय, सांगली) येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आयुक्त यांनी कार्यालयीन कामकाजाबाबत मार्गदर्शन केले.

तसेच, गट ‘ब’ व गट ‘क’ मधील नुकत्याच पदोन्नत झालेल्या कर्मचाऱ्यांची विभागीय परीक्षा नोव्हेंबर २०२५ अखेर घेण्यात येणार आहे. ज्या कर्मचाऱ्यांचे वय ५० वर्षांपेक्षा अधिक आहे, त्यांचे ५०-५५ वर्ष पुनर्विलोकन करण्यात येणार आहे. शिवाय, सर्व कर्मचाऱ्यांनी नियुक्ती झालेल्या विभागात फेस रीडिंग प्रणालीद्वारे हजेरी नोंदवणे अनिवार्य असून, सकाळी ९.४५ वा. कार्यालयात उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे.

या बैठकीस मा. अतिरिक्त आयुक्त, मा. उपायुक्त तसेच सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button