मिरजेत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या दुर्गामाता दौडीत आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी घेतला सहभाग

मिरज, ता.२: मिरज येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तर्फे आयोजित श्री दुर्गामाता दौडीमध्ये मिरजेचे आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी सहभाग नोंदवला. या दौडमध्ये मोठ्या संख्येने तरुण-तरुणींनी भगवा ध्वज हातात घेऊन, “जय भवानी… जय शिवाजी” च्या घोषणांनी दुमदुमलेले वातावरण, तरुणाईचा उत्साह आणि श्रद्धेची उर्मी या सर्वामुळे हा सोहळा अधिकच भव्य आणि प्रेरणादायी ठरला. शिस्तबद्ध संघटन, देशभक्ती आणि परंपरेशी निष्ठा यांचा सुंदर संगम या दौडीत दिसून आला. या ऐतिहासिक परंपरेत ध्वजधारी म्हणून उभे राहण्याची संधी मिळणे हा माझ्यासाठी एक अभिमानास्पद क्षण आहे असे आमदार सुरेश भाऊ खाडे म्हणाले. हा सोहळा केवळ भक्तिरसच नव्हे तर शौर्य, संघटनशक्ती आणि समाजजागृतीची प्रेरणाही देतो. माता दुर्गेच्या आशिर्वादाने अशा पवित्र आणि प्रेरणादायी उपक्रमांची परंपरा भविष्यातही अधिक जोमाने पुढे जावी, अशी मनापासून इच्छा आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी व्यक्त केली.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button