घरफोडीतील अट्टल चार गुन्हेगार जेलबंद, स्थानिक गुन्हे शाखेकडून १३ गुन्हे उघडकीस, १० लाखांचा मुद्देमाल जप्त


सांगली, ता.१: स्थानिक गुन्हे शाखेला चोरीचे १३ गुन्हे उघडकीस आणण्यास मोठे यश आले आहे. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर, विटा, पेट वडगाव, आटपाडी तसेच कर्नाटक व तेलंगणा राज्यात घरफोडी करणाऱ्या चार अट्टल गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेने इस्लामपुरात अटक केले. आकाश कल्लाप्पा काळे, वय २७ वर्षे, रा. एकतानगर, सातारा रोड, जत, ता. जत, जि. सांगली, सचिन अभिमान काळे, वय ३२ वर्षे, रा. यल्लमवाडी, ता. मोहोळ, जि. सोलापुर, दत्ता संपत चव्हाण, वय ५४ वर्षे, रा. एकतानगर, सातारा रोड, जत, ता. जत, जि. सांगली, गोविंद राजु काळे, वय २८ वर्षे, रा. उमराणी रोड, जत, ता. जत, जि. सांगली असे अटक केलेल्या गुन्हेगारांचे नावे असून त्यांच्याकडून १० लाख ३१ हजार ६३० रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये) ५,००,०००/- रु. किंमतीची १ माई हुंडाई कपंनीची चारचाकी, ५,१८,०००/- रु. किंमतीचे ४६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, १३,०००/- रु किंमतीचे १०० वजनाचे चांदीचे दागिने, ६३०/- रु. किंमतीचे साहित्य त्यात काहया रंगाची सॅक, कटावणी, लोखंडी पोपट पाना, २ स्टीलचे स्कु ड्राईव्हर एक स्टीलचा भरीव रॉड असा हा एकूण (१०,३१,६३० रु.) दहा लाख एकतीस हजार सहाशे तीस रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांची अधिक माहिती अशी की, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी तयार केलेले सपोनि/ जयदिप कळेकर, सपोनि/ सिकंदर वर्धन यांचे पथकामधील पोकों / प्रमोद साखरपे, पोहेकॉ संजय पाटील, आणि पोहेकों/हणमंत लोहार यांना त्यांचे गोपनिय बातमीदाराकडून तसेच तांत्रिक माहितीव्दारे माहिती मिळाली की, इस्लामपुर पोलीस ठाणेत चोरीचा गुन्हा दाखल असून सदर गुन्हा हा आकाश कल्लाप्पा काळे, सचिन अभिमान काळे, दत्ता संपत चव्हाण, गोविंद राजु काळे यांनी केला आहे. सदर चौघांना ताब्यात घेवून घरफोडी चोरीच्याबाबत चौकशी केली असता आकाश काळे याने सांगितले की, घरफोडी चोरी करणेकरीता आय २० चार चाकी वाहन क्र. एम एच १२ पी झेड २१९८ वाहनातुन तो आणि त्याचेसोबत असले दत्ता चव्हाण, सचिन काळे आणि गोविंद काळे यांनी मिळून वरील प्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी घरफोडी चोरीचे गुन्हे केले असल्याची कबुली दिली. हे चारही अट्टल गुन्हेगार असून त्यांचावर सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर, विटा, पेट वडगाव, आटपाडी तसेच कर्नाटक व तेलंगणा राज्यात पोलीसांत गुन्हे नोंद आहेत. त्यांच्याकडून
१० लाख ३१ हजार ६३०/- रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पुढील तपासकामी सदरचे चारही आरोपी व जप्त मुद्देमाल इस्लामपुर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास इस्लामपुर पोलीस ठाणे करीत आहेत.

पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सपोनि/जयदिप कळेकर, सपोनि/ सिकंदर वर्धन,
कर्मचारी संजय पाटील, सुर्यकांत सांळुखे, हणमंत लोहार, संदीप पाटील, अरुण पाटील, सोमनाथ गुंडे,अतुल माने, रणजीत जाधय, प्रकाश पाटील, बसवराज शिरगुप्प्पी, चापोहेकों/ शिवाजी शिद, प्रमोद साखरपे, सुनिल जाधव, रोहन घस्ते, अभिजीत ठाणेकर, केरुवा चव्हाण, अभिजीत माळकर, पवन सदामते, संकेत कानडे, सुरज थोरात, संदीप पाटील, प्रवीण धोत्रे कुरळप पोलीस ठाणे, करण परदेशी, अजय पाटील, अभिजीत पाटील, मपोकों / शांता कोळी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button