स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; महाराष्ट्र राज्यासह कर्नाटकातील वाहनेचोरी करणाऱ्या पोलीसांच्या ताब्यात, २२ वाहने जप्त

१६ लाखांचा मुद्देमाल जप्त

महाराष्ट्र राज्यासह कर्नाटकातील वाहने चोरणारा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात; २२ वाहने जप्त


सांगली, ता.२९: सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई. महाराष्ट्र राज्यासह कर्नाटकातील वाहने चोरी करणारा संशयीत चोराच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मुसक्या आवळल्या. फिरोज नबीलाल मुल्ला, वय ३१ वर्षे, रा. मानुगडे गल्ली, जुळेवाडी, ता. तासगाव, जि. सांगली असे ताब्यात घेतलेल्या संशयीताचे नाव आहे. त्याच्या कब्जातून २२ दुचाकी व चार चाकी असे एकूण १६ लाख १० हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर वाहने ही सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सातारा या जिल्ह्यांसह कर्नाटक राज्यातील आहेत.

पोलिसांची अधिक माहितीनुसार सांगली पोलीस प्रमुख संदीप घुगे व अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुध्दचे गुन्हे करणारे इसमांची माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करुन मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने स्थानिक शाखेचे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा पोलीस निरीक्षक, पंकज पवार व स्टाफ यांचे एक पथक तयार केले. सपोनि/ पंकज पवार यांचे पथकामधील पोहेकों / मच्छिद्र बर्डे आणि पोहेकों / सतिश माने यांना त्यांचे बातमीदाराकडून बातमी मिळाली की, फिरोज मुल्ला, रा. जुळेवाडी याने काही दुचाकी गाड्या चोरल्या असून तो चोरीची दुचाकी विक्री करणेकरीता पाचवा मैल परिसरात विना क्रमांकाच्या होंडा शाईन दुचाकीवरुन येणार आहे.

नमुद पथकाने सदर ठिकाणी सापळा रचून थांबले असता बातमी प्रमाणे एक इसम विना क्रमांकाच्या होंडा शाईन गाडीवरुन पलुस रोडने येवून भिलवडीकडे जाणारे रोडवर बसस्टॉप शेड जवळ येवून थांबलेला दिसला असता सपोनि/ पंकज पवार यांच्या पथकाने त्यास ताब्यात घेवून विचारपुस अंगझडती केली असता त्याचे पॅन्टचे उजव्या खिशात मोटार सायकलच्या जुन्या चाव्यांचा गट्टा मिळून आला. चाव्याच्या गट्टा व टीच्याजवळलिल दुचाकीबाबत विचारणा केली असता त्याने सदरची मोटार सायकल ही पंधरा दिवसापुर्वी एम आय डी सी कुपवाड येथुन टीचजवळल जुन्या चाव्याचा वापर करून चोरी केले असलेबाबत सांगितले.

सपोनि पंकज पवार यांनी फिरोज मुल्ला यास अधिक विश्वासात घेवून त्याचेकडे कौशल्यपुर्ण तपास केला असता त्याने गेल्या चार महिन्यात कोल्हापुर जिल्हयातील गांधीनगर, रेल्वे स्टेशन, मलकापुर सातारा जिल्हयातील कराड शहरातुन सांगली जिल्हयातील एमआयडीसी कुपवाड, मिरज, कासेगाव आणि सोलापुर जिल्हयातील पंढरपुर, सोलापुर शहरातुन आणि कर्नाटक राज्यातील विजयपुर येथून जाताना बसने जावून त्याचेकडील डुप्लीकेट जुन्या चाव्याचा वापर करून चोरुन आणल्या असून चोरी केलेल्या सर्व मोटार सायकल आणि चार चाकी वाहन तो राहत असले जुळेवाडी गावातील मानुगडे गल्ली येथे खुल्या जागेत लावले असल्याची कबुली दिली.

सदर ठिकण्यावरील २१ दुचाकी आणि १ चारचाकी वाहन जप्त केले. जप्त केलेले वाहनांबाबत सांगली जिल्हयातील एम आय डी सी कुपवाड, महात्मा गांधी चौक, मिरज शहर, इस्लामपुर आणि कासेगाव पोलीस ठाणे, कोल्हापुर जिल्हयातील शाहुवाडी, शाहुपुरी आणि गांधीनगर, सोलापुर जिल्हयातील पंढरपुर शहर, अक्कलकोट, जेलरोड आणि फौजदारी चावडी, सातारा जिल्हयातील कराड शहर आणि कर्नाटक राज्यातील गोल घुमट पोलीस ठाणेमध्ये सदर मोटार सायकल व चार चाकी वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत. जप्त केलेले वाहन व संशयीत आरोपीस पुढील तपासकामी कुपवाड पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले असुन पुढील तपास कुपवाड पोलीस करीत आहे.


सदर कारवाई कारवाई . पोलीस अधीक्षक श्संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर यांचे मार्गदर्शनाखाली पोनि/ सतिश शिंदे,सपोनि / पंकज पवार, पोहवा / मच्छिद्र बर्डे, सतिश गाने, सागर लवटे, नागेश खरात, दरिया बंडगर, सागर टिंगरे, संदीप नलावडे, अमिरशा फकीर, संदीप गुरव, अनिल कोळेकर, अमर नरळे, उदयसिंह माळी, महादेव नागणे, पोकों / विक्रम खोत, केरूबा चव्हाण, चापोकों / गणेश शिंदे, पोकों/ अभिजीत पाटील, अजय पाटील, सायबर पोलीस ठाणे आदींनी केली.






Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button