कौटुंबिक वादातून पत्नीचा खून; खून करून पती पोलीसांत हजर

सांगलीत कौटुंबिक वादातून पत्नीचा खून; परिसरात भीतीचे वातावरण

सांगली : कौटुंबिक वादातून पत्नीचा धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना रविवार दुपारी एकचा सुमारास उघडकीस आली. खून करून संशयीत पती स्वताहून पोलिसात हजार झाला. मृत पत्नीचे नाव काजल प्रशांत एडके (वय अंदाजे ३० वर्षे) आहे. हजर झालेल्या संशयीत पतीचे नाव प्रशांत एडके असे आहे. सदर घटना सांगली येथील शांतीनगर येथे घडली असून परिसरात या घटनेने खळबळ माजली आहे. घटनास्थळी सांगली उपअधीक्षक एम. व्हीमला, सांगली शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे व पोलिसांनी धाव घेत मृतदेह शेवविच्छेदनास पाठीविले. घटनेनंतर आरोपी पती प्रशांत एडके स्वतःहून पोलिस ठाण्यात जाऊन शरण आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू आहे.

घटनेमुळे शांतीनगर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत नागरिकांना शांत करण्याचे आवाहन केले. दरम्यान, या प्रकरणाचा सखोल तपास सांगली शहर पोलिस करत असून या घटनेमुळे कौटुंबिक वादाचे गंभीर परिणाम पुन्हा एकदा समोर आले आहेत.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button