मिरज विधानसभा मतदारसंघातून भाजप कार्यकर्त्याकडून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी उस्फुर्त प्रतिसाद

मिरज, ता.२८: सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी व ढगफुटी सदृश पावसामुळे भीषण पूरस्थिती निर्माण झाली असून हजारो कुटुंबांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतजमिनी, घरे, जनावरं आणि रोजीरोटीचे साधन वाहून गेल्याने पूरग्रस्त बांधवांवर मोठे संकट कोसळले आहे. या कठीण प्रसंगी मी मिरज विधानसभा मतदारसंघातील सर्व भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांना मदतकार्य राबवण्यासाठी मिरज भाजपा आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी आवाहन केले होते. त्या आवाहनाला कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणावर मदत सामग्री जमा केली.

तांदूळ, गहू, आटा, साखर, साबणाच्या वड्या, तसेच जनावरांसाठी वैरण (चारा) अशा जीवनावश्यक वस्तूंचे संकलन करून ती पूरग्रस्त भागात तातडीने पोहोचवण्यात आली.ही मदत पूरग्रस्त बांधवांना नक्कीच दिलासा देणारी ठरेल —–—सुरेश भाऊ खाडे (मिरज भाजप आमदार)

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button