
आरग, ता.२८: पूरग्रस्तांच्या मदतीला धावले आरगकर.गावातून जीवनाउपयोगी साहित्य व रोख रक्कमेची केली मदत. मिरज विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी आपल्या मतदारसंघात पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्या अनुषंगाने आरग गावात आज गावातील उद्योजक सागर दादा वडगावे यांनी रोख रक्कम ५० हजार रुपये व किरण पाटील, अनिल कोरबु, सर्जेराव खटावे, सुभाष खोत, जयपाल कांबळे, अजित कांबळे, अशोक सुतार, प्रकाश गायकवाड, रमेश कोकरे यांनी आरग गावातून एक आयशर टेम्पो भरून मदत रवाना करण्यात आले आहे.
जीवनोपयोगी वस्तूंचे किट, कडबा, बिस्किट, संसार उपयोगी साहित्य गावातून गोळा करून पाठवण्यात आले आहे.आरगकर हे नेहमीच इतरांच्या मदतीला धावून जात असतात. मिरजेचे आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत आरग वासीयांकडून पूरग्रस्तांसाठी मदत रवाना करण्यात आली आहे.