
सांगली, ता.२४: आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बुधवार (ता.२४) कवठेमहांकाळ व तासगाव येथे काँग्रेस कार्यकर्त्यांशी खासदार विशाल पाटील यांनी संवाद साधला. या संवादातून कार्यकर्त्यांचा उत्साह आणि जनतेचा विश्वास याची प्रचिती आली. खासदार विशाल पाटील म्हणाले की, काँग्रेस पक्ष हा जनतेच्या नाळेशी जोडलेला पक्ष आहे. हीच नाळ अधिक बळकट करण्यासाठी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने पुढे जाण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
स्थानिक विकास, शेतकरी-शेतीचे प्रश्न, तरुणांचे रोजगार आणि गावागावातील मुलभूत सुविधा या मुद्यांवर काँग्रेस पक्ष सातत्याने कार्यरत आहे. कार्यकर्त्यांचा विश्वास, लोकांचा पाठिंबा आणि आपल्या सामूहिक प्रयत्नांतून निश्चितच आगामी निवडणुकांमध्ये यश संपादन करू असे बोलताना म्हणाले. यावेळी आ.डॉ.विश्वजीत कदम , सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी, अध्यक्ष विक्रमसिंहदादा सावंत, जितेश भैय्या कदम, रमेश बागवे त्याचबरोबर तासगाव-कवठेमहांकाळ मधील काँग्रेस नेते, कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.