
कुपवाड, ता.२४: शहरात गंभीर स्वरूपाचा गुन्ह्य करण्याच्या उद्देशाने दुचाकिवरून हत्यार घेऊन फिरणारे दोघेजण कुपवाड पोलिसांच्या ताब्यात. भीमाशंकर मल्लाप्पा कनाळ, वय २० वर्षे, राहुल अनिल जाधव वय २२ वर्षे दोघेही राहणार शांत कॉलनी कुपवाड ता- मिरज ,जि.-सांगली असे ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत. सदर घटनेची पोलीसांत नोंद झाली आहे. याबाबत अविनाश पाटील कुपवाड पोलीस यांनी दिलेली आहे.
पोलिसांच्या अधिक माहितीनुसार कुपवाड सोसायटी चौकात दोन तरुण सुझुकी एक्सेस कंपनीची मोपेड गाडी क्रं- MH-10-ES-2130 वरून मंगळवारी रात्री अकरा चाळीसच्या सुमारास गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्याच्या उद्देशाने विना परवाना धारदार हत्यार घेऊन मोटारसायकलवरून फिरत असल्याचे दिसून आल्याने कुपवाड पोलिस कारवाई करत दोघा तरुणांना ताब्यात घेतले. त्यांच्या कब्जातील ७० हजार रुपयांची एक मोपेड गाडी व धारदार एक हत्यार जप्त करण्यात आले. याबाबत फिर्यादी अविनाश सुनील पाटील कुपवाड पोलीस यांनी दिली या पुढील अधिक तपास सपोनि/ दीपक भांडवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली कुपवाड पोलीस करीत आहे.