कुपवाडात सुमो चालकाने सहा जणांना ठोकरले

कुपवाड, ता.२४: शहरातील मुख्य रस्त्यावर मंगळवारी रात्री नागराज चौकात मराठी शाळेजवळ मधधुंद असलेल्या सुमोचालकाने भरधाव वेगाने चुकीच्या बाजूने गाडी चालवत मागून धडक देत दुचाकी व पायी चालत जाणाऱ्यांना सहा जणांना ठोकरले. या अपघातात महिलासह चौघे गंभीर जखमी झाली आहेत. आयेशा समीर नदाप, वय २८वर्ष, व्यवसाय-खाजगी नोकरी , रा.शांत कॉलनी, कुपवाड, कुमार आप्पा शिंदे, सागर संजय राजभर, नीरज सागर राजभर, आदित्य सागर राजभर, यशोदा सुधीर निषाद असे आपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत. अपघातानंतर संतप्त झालेल्या नागरीकांनी सुमो चालकाला प्रसाद देत पोलिसांच्या हवाले केले. सुमो चालकाचे नाव रमेश पांडुरंग गोयकर, वय २१ वर्ष, रा. ढवळेश्वर कॉलनी, कुपवाड असे आहे. सदर घटनेची कुपवाड पोलीसांत नोंद झाली असून जखमी आयेशा समीर नदाप यांनी फिर्याद दिली आहे. सुमो चालकाविरुद्ध पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांची अधिक माहिती अशी की, मंगळवारी रात्री मधधुंद अवस्थेत असणाऱ्या सुमो चालकाने चुकीच्या बाजूने गाडी चालवत फिर्यादी आयेशा त्यांच्या अॅपल मोबाइल शॉपी समोर त्यांची गाडी पार्क करून सुजुकी बर्गमन MH-10-EM-1353 या गाडीवर बसले असताना एमआयडीसी कुपवाड कडून सुमो जीप क्र.MH-10-BM-7362 ही भरधाव वेगाने राँग साईडला येऊन पाठीमागून धडक दिल्याने फिर्यादीसह सहाजण जखमी झाले. घटनास्थळी कुपवाड पोलिसांनी धाव घेत आयुष हेल्पलाईन टीम मदतीने जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. सुमो चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून सुमो मधील अन्य दोघे पसार झाले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button