
कुपवाड, ता. २२ : औधोगिक वसाहत रोडजवळ क्रेन च्या धडकेत काननवाडीतील वृद्ध ठार झाला. सदर घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली. संतू भीमा भोरे (वय ७० रा. कानडवाडी ता. मिरज) असे त्यांचे नाव आहे. कुपवाड वसाहतीतून सावळी (ता. मिरज) मार्गे कानडवाडीला पायी जात असताना मागून क्रेनने (एमएच १० सीएन ०८७९) ने जोरदार धडक दिली. क्रेनचे चाक अंगावरून गेल्यामुळे ते गंभीर जखमी झाले होते. धडक देऊन क्रेन चालक प्रसार झाला. जखमीला उपचारासाठी आयुष हेल्पलाईन टीमच्या मदतीने मिरज शासकीय रुग्णालयात नेले असता उपचार दरम्यान संतु भोरे यांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी कुपवाड औद्योगिक पोलिस ठाण्यात क्रेन चालक संतोष गोरख बाबर (वय २५, सध्या रा. दत्तनगर बामणोली ता. मिरज मूळगाव : सांगोला जि. सोलापूर) या गुन्हा नोंदविण्यात आला. याबाबतची फिर्याद प्रवीण भोरे यांनी दिली.