कवठेमहांकाळ येथील डॉक्टर दांपत्याची फसवणूक करणाऱ्या टोळीतील ३ संशयित ताब्यात; १ कोटी २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली व कवठेमहांकाळ पोलीस पथकांची कारवाई

कवठेमहांकाळ, ता.१८: येथे म्हेत्रे डॉक्टर यांच्या घरी रविवारी (ता.१४) रोजी आयकर अधिकारी असल्याचे भासवून तीन संशयित इसम व एक महिलाने डॉक्टर दांपत्याची १ कोटी २० हजार रुपयांची फसवणूक करून लुबाडून नेल्या प्रकरणी तिघां संशयितांना सांगली स्थानिक गुन्हे शाखेने व कवठेमहांकाळ पोलिसांनी संयुक्त कारवाई करत तिघांचा मुसक्या आवळल्या. दिक्षा राष्ट्रपाल भोसले वय २५ वर्षे, रा. काकडे पार्क, बिल्डिंग नं. एफ-१, चिंचवड, पुणे, पार्थ महेश मोहिते वय २५ वर्षे, रा. मंगळवार पेठ, कोल्हापूर, साई दिपक मोहिते वय २३ वर्षे, रा. प्रगतीनगर, पांचगाव ता-करवीर जि-कोल्हापूर असे ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत.

पोलिसांची अधिक माहिती अशी की, रविवार (ता.१४) रोजी रात्री डॉक्टर म्हेत्रे यांच्या घरातून आयकर अधिकारी असल्याचे भासवत या टोळीने दागिने व रोख रक्कम असे एकूण १ कोटी २० रुपयांचा मुद्देमालासोबत फरार झाले. घटनास्थळी पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी जत विभाग जत सचिन थोरबोले यांनी भेट देवून वेगवेगळी पथके तयार करुन तपासाबाबत मार्गदर्शन केले.

या गुन्हयांचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व कवठेमहांकाळ पोलीस ठाणे यांनी वेगवेगळी पथके तयार करुन गुन्हयांचा तपास सुरु केला. यादरम्यान सहा. पोलीस निरीक्षक, पंकज पवार, नितीन सावंत, कवठेमहांकाळ पोलीस ठाणे कडील दत्तात्रय कोळेकर व पोलीस उप-निरीक्षक विनायक मासाळ व पोलीस स्टाफ यांची पथके तयार करुन सोलापूर, मुंबई, कोल्हापूर, पुणे, कर्नाटक राज्य येथे रवाना करुन आरोपीबाबत माहिती घेण्यात आली.

तांत्रिक माहिती व गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या बातमीप्रमाणे सदर गुन्हयातील संशयीत महिला ही पुणे येथे असल्याचे निष्पन्न झाल्याने तात्काळ महिला पोलीस उपनिरीक्षक तेजश्री पवार व स्था. गु. शा. कडील स्टाफ यांचे पथक तयार करून पुणे येथे जाऊन महिला नागे दिक्षा राष्ट्रपाल भोसले वय-२५ वर्षे राहणार-काकडे पार्क, बिल्डिंग नं. एफ-१, चिचवड, पुणे हिला ताब्यात चौकशी केली असता सदर गुन्हा साथीदारासोबत मिळून केला असल्याचे कबूल करुन साथीदारांचे माहिती दिली. दिलेल्या माहितीने सदर ठिकाणावरून संशयीत आरोपी पार्थ महेश मोहिते वय २५ वर्षे, रा.गंगळवार पेठ, कोल्हापूर व साई दिपक मोहिते वय २३ वर्षे, रा. प्रगतीनगर, पांचगाव ता-करवीर, जि-कोल्हापूर यांना सापळा रचून शिताफीने हातकणंगले जि-कोल्हापूर येथून ताब्यात घेतले. बॅग तपासली असता त्यामध्ये एकूण १,४१० ग्रॅम सोन्याचे दागिने, बिस्किटे व रोख रक्कम १५,०५,०००/- रुपये मिळून आले. सदर सोने व रोख रक्कम कवठेमहांकाळ येथील डॉ. म्हेत्रे यांना आयकर अधिकारी असल्याचे भासवून त्यांची फसवणूक आणली असलेबाबत सांगितले. सदर मुद्देमाल जप्त करून संशयित आरोपी व मुद्दे माल पुढील तपासकामी कवठेमहांकाळ पोलिसांच्या ताब्यात दिले.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी जत्त विभाग जत सचिन धोरबोले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, पोलीस निरीक्षक जोतीराम पाटील, सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार, सहा. पोलीस निरीक्षक नितीन सावंत, सहा. पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर, सहा. पोलीस निरीक्षक रुपाली बोबडे, पोलिस उप-निरीक्षक तेजश्री पवार, पोलीस उप-निरीक्षक विनायक मासाळ, सपोफौ/स्वप्ना गराडे, पोहवा / सागर लवटे, नागेश खरात, दरिबा बंडगर, सागर टिंगरे, संदीप नलावडे, अमिरशा फकीर, सतिश माने, संदीप गुरव, मच्छिद्र बर्डे, उदयसिंह माळी, अनिल कोळेकर, अमर नरळे, आमसिध्दा खोत, सोमनाथ गुंडे, इम्रान गुल्ला, अतुल माने, अमोल ऐदाळे पोकों / केरूबा चव्हाण, विक्रम खोत, पोना/नागेश मासाळ, पोकों/सिध्दराम कुंभार, अभिजीत कासार, शितल जाधव, स्वप्निल पाटील, पोकों/ अभिजीत पाटील, अजय पाटील, अजय बेंद्रे, शांता कोळी आदींनी केली. या पुढील अधिक तपास कवठेमहांकाळ पोलीस करीत आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button