
सांगली, ता.१९: कवठेमहांकाळ येथील डॉक्टरांची घरी आयकर विभागाचे अधिकारी असल्याचे सांगून पैसे व दागिने फसवणूक करून लुबाडून नेण्याऱ्या टोळीतील अन्य दोन संशयित आरोपी शुक्रवारी (ता.१९) स्वतः पोलिसात हजर झाले.
पोलिसांची अधिक माहिती अशी की, रविवार (ता.१४) रोजी रात्री अकरा ते बाराच्या दरम्यान तीन इसम व एक महिलने कवठेमहांकाळ येथील डॉक्टर दांपत्यांची आयकर विभागाचे अधिकारी असल्याचे भासवत फसवणूक करून रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा हा एकूण १ कोटी २० लाखांचा मुद्देमाल लुबाडून नेण्याऱ्या तिघा संशयितांना सांगली स्थानिक गुन्हे शाखेने व कवठेमहांकाळ पोलिसांनी संयुक्त कारवाई करत ताब्यात घेतले. आरोपीकडून १४१ तोळे सोन्याचे दागीने व १५,०५,०००/- रोख रक्कम व गुन्हयात वापरलेले वाहन जप्त केले. तिघा संशयितांना न्यायालयात हजर केले असता २४ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी रिमांड देण्यात आले. सदर गुन्ह्यातील परागंदा असलेले दोघा संशयित आरोपी आज शुक्रवार (ता.१९) रोजी स्वतः पोलीसांत हजर झाले. त्यांच्याकडे चौकशी केली असता गुन्हा केल्याची कबुली दिली. अक्षय सुरेश लोहार वय. ३० वर्षे रा. बुगटे अलुर ता. हुक्केरी जि. बेळगाव राज्य कर्नाटक, शकील गौस पटेल वय. ४४ वर्षे रा. गडहिंग्लज जि कोल्हापूर हे सांगली हजर झालेल्या दोघांची नावे आहेत. पुढील तपासकामी दोघा संशयितांना कवठेमहांकाळ पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले. यापुढील अधिक तपास कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जोतीराम पाटील करीत आहेत.