
सांगली, ता.१६ : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सांगली यांच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या सैनिकी मुलांचे वसतिगृह येथे निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात अशासकीय चौकीदार पद भरावयाचे आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज व अन्य आवश्यक कागदपत्रे दिनांक २३ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९.३५ वाजता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सांगली येथे जमा करावीत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल डॉ. भीमसेन चवदार (निवृत्त) यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
अधिक माहितीसाठी 0233-2990712 या दूरध्वनीवर संपर्क साधावा. चौकीदार पदासाठी माजी सैनिक आल्यास प्राधान्य देण्यात येईल, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.