
बुधगाव, ता.१७: सामान्य जनतेला अधिकाधिक सुविधा देण्यासाठी १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान सांगली अप्पर तहसील कार्यालयाअंतर्गत बुधगाव ग्राम महसूल अधिकारी कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व सेवा पंधरवडा अभियान राबवण्यासाठी विशेष शिबिर आयोजित केलेले आहे अशी माहिती ग्राम महसूल अधिकारी योजना कदम यांनी दिली.
महसूल प्रशासन लोकाभिमुख कार्यक्षम गतिमान व पारदर्शक होण्यासाठी राज्य सरकारकडून अनेक उपक्रम राबविले जातात. याचा अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस १७ सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती २ ऑक्टोंबर दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरावडा साजरा करण्यात येणार आहे. त्याच्या पूर्वसंध्येला आज बुधगाव येथे पाणंद शिवार फेरी व अतिक्रमणित रस्त्याची पाहणी करण्यात आली.
यावेळी बुधगाव गावच्या सरपंच वैशाली पाटील, ग्राम महसूल अधिकारी योजना कदम, ग्रामविकास अधिकारी दस्तगीर मुलानी, जयवंतराव पाटील, दिलीप पाटील, दीपक पाटील, ग्रामपंचायत सदस्य अरुण बंडगर, शुभम कांबळे, धनाजी पाटील, जयश्री पाटील, मीनाक्षी एडके, शुभांगी कोळी, शुभांगी शिंदे, कोतवाल अरुण आवळे, ओंकार पवार तसेच गावातील इतर शेतकरी वर्ग उपस्थित होते.