स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत सांगली मनपात महाआरोग्य शिबिरास सुरुवात

हेड : स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत सांगली मनपात महाआरोग्य शिबिरास सुरुवात

सांगली, ता.१७: केंद्र शासनाच्या स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान अंतर्गत सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमार्फत १७ सप्टेंबर २०१५ ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत एकूण बारा आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याची सुरुवात आज बुधवार १७ सप्टेंबर २०२५ रोजी शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र क्रमांक २, साखर कारखाना येथे झाली. या महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी उप आयुक्त स्मृती पाटील, शुभांगीताई साळुंखे, कांचनताई कांबळे, वर्षाताई निंबाळकर, अनारकली कुरणे मॅडम, संतोष पाटील सर, महेश साळुंखे व मनोज सरगर आदी मान्यवर उपस्थित होते.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी आयुक्त सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली मनपा उपयुक्त स्मृती पाटील मॅडम व वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. वैभव पाटील यांनी समन्वय साधला आहे. शिबिराचे नियोजन आरोग्य केंद्र प्रमुख डॉ. वैशाली पाटील, डॉ. संग्राम पाटील व त्यांच्या स्टाफने केले.

शिबिरात स्त्रीरोग, बालरोग, रक्तदाब व शुगर तपासणी, कर्करोग तपासणी, दंतरोग, अस्थिरोग, त्वचारोग, नेत्ररोग, मानसोपचार तपासणी यांसह रक्तदान शिबिर घेण्यात आले. एकूण ३२१ लाभार्थ्यांनी शिबिराचा लाभ घेतला तर २६ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले. या शिबिरात मनपाच्या तज्ञ डॉक्टरांसोबत भारती हॉस्पिटल, सुदर्शन हॉस्पिटल, कुल्लोळी हॉस्पिटल व होरायझोन हॉस्पिटल यांनी सहकार्य केले. लाभार्थ्यांना आयुष्मान भारत कार्ड देखील वितरित करण्यात आले.


"महिलांच्या आणि बालकांच्या आरोग्याची सर्वांगीण तपासणी होऊन समाजात आरोग्यदायी वातावरण निर्माण होणे हीच या शिबिरांची खरी जमेची बाजू आहे."
----आमदार सुधीरदादा गाडगीळ---

मनपा क्षेत्रातील महिलानी जास्तीत जास्त शिबिरात सहभागी होऊनआरोग्य तपासणी करून घ्यावी. २ ऑक्टोंबर २०२५पर्यंत सदरचे अभियान चालू असणार आहे.
——–सत्यम गांधी आयुक्त——

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button