कुपवाड पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी

कुपवाड, ता.१४: औधोगिक वसाहतमध्ये भरकटलेले अवस्थेत घाबरून एकटी फिरत असलेल्या एका चार वर्षीय मुलीला कुपवाड पोलिसांनी मुलीच्या नातेवाईकांचा शोध घेऊन सुखरूप सुपूर्द केले.पोलिसांच्या या कामगिरीबद्दल नागरिकांकडून कौतुक होत आहे.
औधिगिक वसाहत जेसन फॉन्ड्री जवळ एक चार वर्षाची मुलगी घाबरलेल्या अवस्थेत एकटी फिरत असून ती तुटक-तुटक हिंदी बोलत असल्याची माहिती कुपवाड पोलिसांना शनिवारी (ता.१३) रोजी दुपारी साडे चारच्या सुमारास ११२ वरून मिळाली. माहिती मिळताच ठाणे अंमलदार पाटील, शहा, चालक श्रेणी पोउनि भोसले यांनी तात्काळ धाव घेत लहान मुलीला ताब्यात घेवुन पोलीस ठाणेस आणले. मुलगी लहान असल्याने तिला नाव व पत्ता सांगता येत नसल्याने कुपवाड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि / दिपक भांडवलकर यांनी तात्काळ मुलीच्या नातेवाईकांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या.
सुचनेप्रमाणे अंमलदार व प्रभारी अधिकारी दिपक भांडवलकर यांनी युपी, एम.पी. बिहार, झारखंड येथून एमआयडीसी कारखान्यात कामास असलेल्या लोकांच्याकडे तसचे ठेकेदार, व्यापारी, कारखाना मालक यांना संपर्क करून त्यांचा व्हॉटसअप ग्रुप तयार केला. सदर ग्रूपवर मुलीचा फोटो पाठविले. या व्हाट्सउप ग्रुपमुळे अवघ्या दोन तासातच मुलीच्या नातेवाईकांची माहिती मिळाली. चार वर्षीय मुलीचे नाव आयुषी असून तिचा आईचे नाव पुनम एक्का आहे. आयुषीला सुखरूप तिचा आईकडे सुपूर्द केले.
चार वर्षीय मुलगी जिला नीट बोलता येत नाही. घाबरलेल्या अवस्थेत एकटी फिरत होती. अशा अवस्थेत मुलीच्या नातेवाईकांचा शोध घेणे आव्हानात्मक होते. परिस्थिचीची गांभीर्य ओळखून कुपवाड ठाण्याचे प्रभारी अधिकारी आणि अनोखी शक्कल लढवत कामगार मालक व ठेकेदार यांचा व्हाट्सउप ग्रुप तयार करून अवघ्या दोन तासात मुलीच्या नातेवाईकांकडे मुलीला सुखरूप सुपूर्द केले. कुपवाड पोलिसांनी केलेल्या या कामगिरीबद्दल नागरिक, कंपनी मालक, ठेकेदार, कामगार व मुलीच्या नातेवाईकांकडून कौतुक होत आहे.
कुपवाड पोलीस ठाणेकडून आवाहन करण्यात येत आहे की, नागरिकांनी डायल ११२ या नंबरचा जास्तीत जास्त उपयोग करून पोलीस ठाणे हद्दीमध्ये घडणाऱ्या घटनांबाबत पोलीसांना माहिती द्यावी. दीपक भांडवलकर कुपवाड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी