खटाव तालुका मिरज येथे एकाच रात्रीत तीन ठिकाणी चोरी

खटाव, ता.५ : मिरज तालुका येथे एकाच रात्रीत तीन ठिकाणी चोरी झाल्याची घटना उघडकीस आली. चोरीमुळे खटाव गावात खळबळ. खटाव तालुका मिरज या ठिकाणी काल मध्ये रात्री मल्लाप्पा पारोजे अक्काताई कुमटे, कुसुम हुक्किरे यांच्या घरामध्ये मध्ये रात्री चोरटे घरात घुसून सोने व रोख रक्कम चोरून नेल्याची घटना घडली आहे. घटनास्थळी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित सिद्ध व सहा. पोलीस निरीक्षक तिप्पे बीटमलदार शिंदे, स्थानिक गुन्हे शाखेचे इम्रान मुल्ला, मगदूम अन्य अधिकाऱ्यांनी खटाव गावातील चोरी झालेल्या ठिकाणी भेट देऊन पाहणी करण्यात आली आहे.

ग्रामपंचायत प्रशासनाने सीसीटीव्ही कॅमेरा न बसविल्यामुळे पोलीस तपासात अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे तातडीने खटाव गावत सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याची मागणी सदस्य संजय कागवाडे केली आहे. सीसीटीव्ही बाबत गेले एक वर्षापासून ग्रामपंचायत प्रशासनाकडे मागणी करत आहे. येणाऱ्या आठ दिवसांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्याची मागणी करण्यात आले आहे.

एकाच रात्रीमध्ये तीन ठिकाणी चोरी करण्याची ही खटाव गावात पहिलीच वेळ आहे. त्यामुळे खटाव गावात चोरट्यांना पकडण्यासाठी पोलीसांसमोर नवे आव्हान निर्माण झाले आहे. चोरट्यांचा शोध लावून चोरट्यांना पोलिसांनी लवकरात लवकर अटक करावे अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

येणाऱ्या चार-पाच दिवसांमध्ये खटाव गावातील सर्व ठिकाणी चौका चौकात सीसीटीव्ही कॅमेरा बसण्यात येईल असे आश्वासन – सरपंच रावसाहेब बेडगे

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button