एक्शन एड असोसिएशन व असंघटित कामगार युनियन महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने सांगली जिल्ह्यांमध्ये POSH कायद्या विषयी जनजागृती अभियान

सांगली, ता.७ : एक्शन एड असोसिएशन व असंघटित कामगार युनियन महाराष्ट्र ह्यांच्या संयुक्त विद्यमाने सांगली जिल्ह्यांमध्ये POSH कायद्या विषयी जनजागृती अभियान सुरू. “सांगली जिल्ह्यात POSH कायद्याविषयी महिलांमध्ये जनजागृती वाढवण्यासाठी जिल्हा परिषद व ग्रामपंचायत पातळीवर विविध कार्यक्रम सुरू झाले आहेत.

ट्रेनिग, शिबिर, चर्चा सत्र, पोस्टर प्रदर्शन व कायदेविषयक मार्गदर्शन यांचा यामध्ये समावेश आहे. महिलांमध्ये सुरक्षितता आणि कायदेविषयक माहिती पोहोचवणे हे अभियानाचे उद्दिष्ट असून स्थानिक महिला कर्मचारी,संरपच व शाळा शिक्षक यांनी सहभाग नोंदवला आहे. या उपक्रमामुळे कार्यस्थळी सुरक्षित वातावरण निर्माण होईल अशी अपेक्षा आहे. या कार्यक्रमाचे आयोजन अंकली गावचे सरपंच राहुल पाटील, उपसंरपच शितल सुतार, माजी सरपंच काजल कोलप, पोलीस पाटील शिल्पा कोलप, सदस्य वर्षा शिंदे, सामाजिक कार्यकर्ती शबाना शेख आदींनी केले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button