
कुपवाड, ता.२५: आगामी गणेशोत्सवच्या पार्श्वभूमीवर कुपवाड पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. पोलीस प्रमुख संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर व मिरज उपाधीक्षक प्रणील गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली कुपवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी २२० गुन्हेगारांनवर प्रतिबंधक कारवाई तर २१ सराईत गुन्हेगारांना हद्दपारची कारवाई केली. गणेशोत्सवच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेसह शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरीता कारवाई करण्यात आली असल्याची दीपक भांडवलकर यांनी सांगितले.


