
कुपवाड, ता.२३ : विना परवाना अवैध हातभट्टी दारू बाळगणाऱ्यावर कुपवाड पोलिसांची कारवाई. कुपवाड दत्तनगर येथे शुक्रवारी (ता.२२) रोजी रात्री पावणे बाराच्या सुमारास कुमार प्रभाकर स्वामी वय ३५ वर्षे, रा. जतरोड, तालुका कवठेमंकाळ जिल्हा सांगली, सध्या रा. दत्तनगर कुपवाड ता.मिरज हा तरुण स्वता जवळ सतरा लिटर देशी हातभट्टी दारू अवैधरित्या विना परवाना बेकायदेशीरपणे विक्री करण्याच्या उद्देशाने थांबलेला असताना मिळून आला. त्याच्यावर संशय आल्याने कुपवाड पोलिस कारवाई करत त्याचाकडील सतराशे रुपये किंमतीची देशी हातभट्टी सतरा लिटर दारू जप्त केली.
कुमार स्वामीवर 184/2025 महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 चे 65 (ड) (इ)प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. यापुढील अधिक तपास पोलीस करीत आहे.