
कुपवाड, ता.२२: येथे दुचाकीवरून हत्यार घेऊन फिरणाऱ्या दोघांवर कुपवाड पोलिस कारवाई करत दोघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. निखिल अनिल साठे वय १८ वर्षे, रा. शांत कॉलनी कुपवाड ता. मिरज, प्रणित प्रकाश मागाडे वय २१ वर्षे, रा.कापसे प्लॉट गणपती मंदिर शेजारी, कुपवाड, ता. मिरज ताब्यात घेतलेल्या तरुणांचे नावे आहेत.
पोलिसांची अधिक माहिती अशी की, कुपवाड येथे २१ ऑगस्ट रोजी रात्री दोन तरुण गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्याचा उद्देशाने दुचाकीवरून कोयता घेऊन फिरत असल्याचे माहिती कुपवाड पोलिसांना मिळाली. कुपवाड पोलीस सदर ठिकाणी धाव घेत दोघा तरुणांवर कारवाई केली. दोघा संशयित तरुणांना ताब्यात घेऊन त्यांच्या कब्जातील कोयता व टिव्हीएस स्टार कंपनीची दुचाकी आरटीओ रजिस्टर नंबर (एमएच 10 एडी 3208 ) असा २५ हजार १०० रु.किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
सदर घटनेची कुपवाड पोलीसांत नोंद झाली असून यापुढील अधिक तपास कुपवाड पोलीस करीत आहे.