आगामी गणेशोत्सवच्या पार्श्वभूमीवर आयुक्तांची पाहणी

आगामी गणेशोत्सवच्या पार्श्वभूमीवर पूर्व नियोजन करण्याच्या आयुक्त सत्यम गांधी यांच्या सूचना

कुपवाड, ता.२२ : मनपा आयुक्त सत्यम गांधी यांनी आगामी गणेशोत्सवच्या पार्श्वभूमीवर पूर्व नियोजनासाठी कुपवाड परिसर व भागातील गणेशमूर्ती विसर्जन ठिकाणे आणि मिरवणूक रस्त्याची पाहणी केली. कुपवाड येथील यलम्मा मंदिर येथील विहीर, परिसर, खताल विहीर, कुपवाड मिरज रोड वरील विहीर इत्यादी ठिकाणी पाहणी करून अभियंता महेश मदने यांना खबरदारी घेऊन आवश्यक त्या सुधारणा करण्याबाबत आयुक्तांनी सूचना दिल्या.

यावेळी अति आयुक्त राहुल रोकडे, उपआयुक्त स्मृती पाटील, स्वच्छता निरीक्षक उपस्थितीत होते.

मनपाच्या वतीने गणेशोत्सवबाबत सर्व तयारी करण्यात येणार आहे. आगामी गणेशोत्सव निमित्त आगमन व मिरवणूकीला कोणतेही अडचण येऊ नये यासाठी रस्त्यावरील खड्डे भरून घेऊन परिसर स्वच्छता, लाईट व्यवस्था करणार असल्याचे सांगितले. गणेश मंडळांना कोणतीही अडचण अडथळा होणार नाही याची दक्षता  घेण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button