
सांगली, ता.२१: अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीची अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रातील ३५ ते ४० फुटांच्या पाणी पातळी वर पूर बाधित होणाऱ्या मगरमच्छ कॉलनी, गवळी गल्ली या परिसराची पाहणी केली. तेथील स्थानिक नागरिकांनी प्रशासनाचे पालन करून शासनाने सोय करून दिलेल्या निवारा केंद्रामध्ये स्थलांतरित झाले आहेत. तसेच काही नागरिक स्थलांतराच्या प्रतीक्षेत असून प्रशासनाचे नियमांचे पालन करण्यासाठी स्थानिक नागरिकांना सूचना केल्या. सध्या पूर परिस्थिती नियंत्रित आणण्यासाठी सर्व प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. तरी आता पाणी पातळी स्तर असून कोयना मधून पाण्याचा विसर्ग कमी केला आहे.आम्ही तुमच्या सोबत सदैव आहे, फक्त घाबरू नका सतर्क रहा…!! असे आमदार सुधीर गाडगीळ म्हणाले.
यावेळी माजी नगरसेविका भारतीताई दिगडे, नसीमभाभी शेख, अविनाश मोहिते, विशाल पवार, विजय साळुंखे, रवींद्र वादवणे, प्रकाश आवटी, मोहन चोरमुले, अंकुश जाधव, अमोल पाटील आदी प्रशासकीय अधिकारी आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.