
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सागर माने यांचे निवेदन
कुपवाड , ता.२० : राष्ट्रवादी काँग्रेसचे सांगली शहर सरचिटणीस सागर माने (वय ३७ रा. राजाराम बापू हौसिंग सोसायटी, कुपवाड) यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन. कुपवाड वाघमोडेनगरला झालेल्या खूनी हल्ल्यातील आरोपींपासून माझ्या जिवितास धोका आहे. हल्ल्यातील आरोपींना हद्दपार करावे व मला पोलीस संरक्षण मिळावे. हल्लेखोरांमुळे माझ्यासह कुटुंबियांना धोका असल्याचे अशी मागणी निवेदनाद्वारे करणयात आले आहे.
सादर निवेदनात म्हंटले आहे , माझे मित्र दत्तात्रय पाटोळे यांची १० जुलै २०२० रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती. सध्या त्यांची पत्नी वनिता पाटोळे यांना व्यवसायात तसेच कोर्ट कामात मदत करतो. याचाच राग मनात धरून गेल्यावर्षी ८ जुलै २०२४ रोजी माझ्यावरती वाघमोडेनगर कुपवाड येथे एकूण दहा जणांच्या टोळक्याने माझ्यावरती पिस्तूल रोखत हल्ला केलेला होता. पण पिस्तूलातून गोळी झाडण्याचा प्रयत्न केला असता गोळी सुटली नाही. पुन्हा धारदार कोयते घेऊन त्यांनी माझा पाठलाग गेला. त्यातून सुदैवाने वाचलो

माझ्यावरती झालेल्या हल्ल्यातील दहा पैकी तिघांवर पोलिसांनी हद्दपारीची कारवाई केलेली आहे. उर्वरित सातजण हे सध्या मी वास्तव्यास असणाऱ्या परिसरात वावरत आहेत. सर्वजण सराईत गुन्हेगार आहेत. त्यांचेवर खून, खंडणी, अपहरण याप्रकारचे गंभीर गुन्हे नोंद आहेत. मला व माझ्या कुटूंबाला त्यांच्यापासून धोका आहे. त्यासाठी पोलिसांकडून संरक्षण मिळावे. तसेच निवेदनाची दखल घेऊन उर्वरित सातही जणांना हद्दपार करावे. कारण त्यांच्याकडून मला पुन्हा धोका निर्माण होऊ शकतो.