
बुधगाव ,ता.२० : शहर नाभिक समाजाच्या वतीने बुधगाव येथे संत सेना महाराज समाधी सोहळा २० ऑगस्ट रोजी संपन्न झाला. नाभिक समाजाच्या वतीने सलग 3 दिवस विविध कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. शेवटच्या दिवशी ह.भ.प.अनंत कुंभार महाराज यांच्या निरुपणाने हा सोहळा संपन्न झाला. तसेच गावातील सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले होते.
नाभिक समाजाचे ॲड.तेजस सन्मुख यांनी युजीसी नेट परीक्षेत यश मिळवल्याबद्दल समाजाच्या वतीने त्यांचा सत्कार ह.भ.प. कुंभार महाराज व पंचायत समितीचे माजी उपसभापती विक्रमभाऊ पाटील यांच्याहस्ते करण्यात आला.
यावेळी नाभिक समाजाचे सांगली जिल्हाध्यक्ष सागर चिखले यांच्यासह मान्यवरांनी भेट देत संत सेना महाराज यांचे दर्शन घेतले. गावातील वारकरी संप्रदाय, महिला व नाभिक समाजातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाच्या आयोजनासाठी राजेंद्र काटकर, प्रल्हाद सन्मुख, मा.पोलिसपाटील बाळासाहेब सन्मुख, मारुती काशिद, सुधीर सन्मुख, नागेश सन्मुख, गणेश सन्मुख, संतोष सन्मुख, महेश काशिद, संतोष साळुंखे, दिलीप सन्मुख, नवनाथ सपकाळ, रविंद्र सन्मुख, दिगंबर साळुंखे, प्रकाश काटकर, किरण काटकर, अवधूत सन्मुख, जयंत सन्मुख, अविनाश काळे, सूरज काटकर यांच्यासह सर्व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.