पुराच्या पाण्याच्या ठिकाणी जाण्यास मनाई

सांगली, ता.२० : पुराच्या पाण्याच्या ठिकाणी जाण्यास मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत. धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे व सध्या पडत असलेल्या पावसाच्या पाण्यामुळे नदी पात्रात वाढ झाल्याने पुराचे पाणी पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत असल्याचे निदर्शनास येत आहे.

आयर्विन पुलावरून तसेच नदी काठावरील असणाऱ्या गावामध्ये काही तरुण मुले व नागरिक पुराच्या पाण्यात पुलावरून उड्या मारणे, स्टंटबाजी करून सेल्फी घेत असल्याचे प्रकार पडत आहेत. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता एकूण ११ पोलीस ठाणे हद्दीतील विविध ठिकाणी व त्यापासून १०० मीटर परिसरात पूर परिस्थिती सामान्य होईपर्यंत भारतीय नागरिक संरक्षण संहिता 2023 चे कलम 163 अन्वये प्राप्त अधिकारानुसार जिल्हा दंडाधिकारी अशोक काकडे यांनी मनाई आदेश जारी केले आहेत.


संबंधित ठिकाणाच्या १०० मीटर परिसरात ५ पेक्षा जास्त व्यक्तिंनी विनाकारण जमण्यास, फिरण्यास, वावरण्यास, उभा राहण्यास, पाणी पाहण्यासाठी जाण्यास, फोटो सेशन करण्यास, व्हिडीओ ग्राफी करण्यास, रील्स बनविण्यासाठी जाण्यास मनाई केली आहे. हा आदेश २० ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून ते पूर परिस्थिती सामान्य र्होपर्यंत अंमलात राहील, असे आदेशात म्हटले आहे.

मनाई करण्यात आलेली पोलीस ठाणेनिहाय ठिकाणे पुढीलप्रमाणे.

  • सांगली शहर – आयर्विन पूल, सरकारी घाट, स्वामी समर्थ घाट.
  • सांगली ग्रामीण – हरिपूर – नदीघाट
  • कसबेडिग्रज – कृष्णा नदी पूल
  • कवठेपिरान – सातसय्यद दर्गा
  • माळवाडी – कुंभोज पूल
  • दुधगाव – खोची पूल.
  • मिरज ग्रामीण म्हैशाळ बंधारा.
  • महात्मा गांधी चौक – कृष्णा घाट, कृष्णा घाट परिसर.
  • मिरज शहर – म्हैशाळ रोड वांडरे कॉर्नर.
  • आष्टा – शिरगाव बंधारा, शिगांव पूल,
  • वाळवा (हाळभाग).
  • इस्लामपूर – बहे पूल, ताकारी पूल.
  • शिराळा – सागांव वारणा नदी पूल.
  • कोकरूड – चरण पूल, आरळा पूल, कोकरूड पूल.
  • भिलवडी – भिलवडी पूल, औदुंबर मंदिर, आमणापूर पूल, नागठाणे बंधारा, सुखवाडी ते तुंग नवीन पूल.
  • विटा – कमळापूर ते रामापूर जाणारा पूल.
Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button