मिरवणुकांमध्ये प्लाझमा, बीम लाईट, लेझर बीम लाईटच्या वापरास प्रतिबंध

सांगली, ता.२० : भारतीय नागरिक संरक्षण संहिता २०२३ चे कलम 163 (1) अन्वये प्राप्त अधिकारानुसार जिल्हा दंडाधिकारी अशोक काकडे यांनी सांगली जिल्हा स्थलसीमा हद्दीत २५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ७ वाजल्यापासून ते ७ सप्टेंबर २०२५ रोजीचे १२ वाजेपर्यंत सांगली जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या मिरवणुकांमध्ये व्यक्ती, समुदाय, मंडळ यांच्यामार्फत प्लाझमा, बीम लाईट आणि लेझर बीम लाईटच्या (Plasma, Laser beam light, Beam light) वापरास प्रतिबंध केला असल्याचे आदेश निर्गमित केले आहेत.

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती, समुदाय, मंडळ यांच्यावर पोलीस विभागाने आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्याची असल्याचे आदेशात म्हटले आहे.
जिल्ह्यात २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर२०२५ या कालावधीत गणेशोत्सव व ५ सप्टेंबर २०२५ रोजी ईद-ए-मिलाद (महंमद पैगंबर जयंती) हा सण साजरा केला जाणार आहे. या कालावधीत मोठ्या प्रमाणात मिरवणुका होतात.

या मिरवणुकांमध्ये प्लाझमा, बीम लाईट आणि लेझर बीम लाईट्‌सचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. प्लाझमा, बीम लाईट आणि लेझर बीम लाईटच्या प्रखर प्रकाशामुळे रस्त्यावरून जाणारे वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून वाहन मिरवणुकीमध्ये जावू शकते व त्यामुळे अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले व मिरवणूक पाहण्यास आलेली लहान मुले, वयोवृध्द, जेष्ठ नागरिक, सामान्य नागरिक यांच्या डोळ्यास इजा होवून त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने हे आदेश देण्यात आले आहेत.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button