
पूर भागात महापालिकेच्या आरोग्य अग्निशमन याचबरोबर वीज मंडळ पोलीस तैनात
सांगली, ता.२०: सांगलीच्या पूर पट्ट्यात प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. सांगलीच्या कृष्णा नदीने ३५ फुटाची पातळी ओलांडल्यानंतर जामवाडी सूर्यवंशी प्लॉट इनामदार प्लॉट या परिसरामध्ये नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरायला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर सर्व प्रशासकीय यंत्रणा नागरी वस्तीतील लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी दाखल झाले आहेत. यामध्ये महापालिकेकडून वैद्यकीय पथक या परिसरात तैनात करण्यात आला असून पोलीस दल आणि वीज मंडळाचे कर्मचारी सुद्धा या ठिकाणी तैनात आहेत. आतापर्यंत महापालिकेच्या निवारा केंद्रात ५० कुटुंबांनी स्थलांतर केले असून अजूनही पाणीपातळी वाढण्याची शक्यता असल्याने नागरिक स्वतःहून स्थलांतर होत आहेत.