नागरिकांनी वाढती पाणी पातळी लक्ष्यात घेऊन वेळेत स्थलांतरित होणे आवश्यक – सत्यम गांधी (मनपा आयुक्त)

कृष्णा नदीचे पाणी इशारा पातळीकडे

सांगली, ता.२०: नागरिकांनी वाढती पाणी पातळी लक्ष्यात घेऊन वेळेत स्थलांतरित होणे आवश्यक आहे असे सत्यम गांधी मनपा आयुक्त आवाहन केले आहे. आयुक्त गांधी यांनी यांनी मनपा अधिकारी यांना सतर्क राहून कार्यवाहीसाठी सूचना केल्या आहेत. कोणतेही हानी होऊ नये यासाठी प्रशासन सतर्क आहे. नागरिकांनी ही सहकार्य करावे असे आवाहन मनपा आयुक्त सत्यम गांधी यांनी केले आहे.

मगरमच्छ कॉलनी सूर्यवंशी प्लॉट ,इनामदार प्लॉट , कर्नाळ चौक परिसरातील नागरिकांना स्थळातर होण्यासाठी वारंवार प्रशासन सूचना देत आहे. आयुक्त यांनी पाहणी करून आवश्यक त्या साहित्यसह स्थलांतर होण्याबाबत सूचना दिल्या आहेत. सर्व अधिकारी या भागात नागरिकांशी संवाद साधून स्थलांतरित करण्यासाठी उपस्थितीत आहेत. निवारा केंद्र सर्व सोयींनीयुक्त आहेत. स्थलांतरीत होण्याच्या पूर बधितांसाठी मनपा वतीने योग्य काळजी घेतली जात आहे. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे असे अहवान यावेळी करण्यात येत आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button