मास इंजिनिअरिंग मध्ये साहित्याची चोरी; कर्मचारी कुपवाड पोलिसांच्या ताब्यात

कुपवाड, ता.१३ : मिरज औधोगिक वसाहत मधील मास इंजिनिअरिंग कारखान्यात साहित्याची चोरी. सदर चोरी ही कर्मचाऱ्यानेच केली असून महेश विलास जाधव वय २९ वर्ष, रा. कवलापूर ता. मिरज जि. सांगली असे संशयिताचे नाव आहे. महेशने कारखान्यातून १ लाख ६२ हजार ३६४ रुपयांच्या साहित्याची चोरी केली आहे. ही घटना मंगळवारी (ता.१२) उघडकीस आली. याबाबत व्यवस्थापक सचिन आनंदा घाळे वय ४० वर्ष, रा. चाणक्य चौक, कुपवाड यांनी फिर्याद दिली. कुपवाड पोलीसांत कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिरज औद्योगिक वसाहतीतील मास इंजिनिअरिंग या कारखान्यात फरनेस तयार होते. फरनेस तयार होणाऱ्या कारखान्यामध्ये संशयित महेश जाधव हा कर्मचारी म्हणून नोकरी करत होता. महेश ने मालकांच्या परवानगी शिवाय परस्पर स्वतःचा फायद्यासाठी कारखान्यातून एकूण पंधरा प्रकारचे साहित्याची चोरी केली. त्याची किंमत १ लाख ६२ हजार ३६५ आहे.

मंगळवारी (ता.१२) रोजी हा चोरीचा प्रकार उघडकीस आला. याबाबत तक्रारीसाठी कुपवाड पोलीसांत मास इंजिनिअरिंग चे मालक व व्यवस्थापक यांनी धाव घेतली. व्यवस्थापक सचिन घाळे यांनी कुपवाड पोलिस फिर्याद दिली. या पुढील अधिक तपास कुपवाड पोलिस करीत आहेत.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button