आटपाडी पोलिसांची दमदार कामगिरी; बँकेच्या खात्यातून गायब झालेले पैसे खातेदाराला मिळवून दिले परत

सांगली, ता.१३: आटपाडी पोलिसांची दमदार कामगिरी; बँकेच्या खात्यातून गायब झालेले पैसे खातेदाराला परत मिळवून दिले.
बँक ऑफ इंडिया शाखा, झरे ता.आटपाडी येथील एका ग्राहकाच्या खात्यावरील १२७०० रुपये डिबिट झाले होते. सदर घटनेची सायबर गुन्हे अन्वेषण विभागाकडे गुन्हा नोंद झालेली. पैसे गेल्याने याची तक्रार ग्राहकाने सायबर गुन्हे अन्वेषणकडे केली होती.

आटपाडी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत ग्राहकाला त्याची गेलेली रक्कम परत मिळवून देऊन ग्राहकाला न्याय मिळवून दिला. पोलिसांची या कामगिरी बद्दल तालुक्यातून कौतुक होत आहे.

थोडक्यात माहिती

झरे ता. आटपाडी येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये ग्राहकाचे खाते व कर्ज खाते ही आहे. ग्राहकाला अचानक फोन आला आणि मैने कितने बार फोन किया आप रिप्लाय नही देते. आपको एसएमएस आया है उसमे ओटीपी है वो तुरंत दिजीए, नही तो आपका खाता तुरंत बंद होगा. ग्राहकाने लगेच आपल्या फोन वरील ओटीपी दिला. ओटीपी देत्याच ग्राहकाच्या खात्यावरील १२७०० रुपये डिबीट झाले. ग्राहकाला फोनकॉल्स येण्यापूर्वी BOI ने सुरवात होत असलेले अनेक एसएमएस आले होते. त्या ग्राहकाला वाटले की बँक ऑफ इंडिया मधूनच एसएमएस आले आहेत.अशी ग्राहकांची फसवणूक झाली होती.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button