
कुपवाड, ता१३: अन्यायी व्यवसाय परवाना रद्द करा कुपवाड शहर व्यापारी संघटनेची आयुक्तांचे कडे मागणी करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून महापालिकेकडून जबरदस्तीने अन्याय पद्धतीने व्यवसाय परवाना लागू करण्याचा प्रयत्न होत होता. त्याविषयी मंगळवार (ता.१२) कुपवाड शहर व्यापारी संघटनेने आयुक्त सत्यम गांधी यांची भेट घेऊन हा परवाना रद्द करावी विनंती केली.
मुळात २०१८ पूर्वी दोनशे रुपये परवाना फी तीही काही ठराविक व्यवसायांना मर्यादित असताना २०१८ नंतर अचानकपणे यामध्ये वाढ करून २००० ते ५००० अशी फी भरमसाठ वाढवण्यात आली असून सर्वच व्यवसायांना लागू करण्यात आली, लागणारी कागदपत्रे वाढवण्यात आली अगोदरच शासनाच्या अनेक कर भरून मेताकुटीला आलेला व्यापारी या नवीन कराला विरोध करायला लागले. अशात जबरदस्तीने नोंदणी करण्याचा प्रकार घडत होता. हा प्रकार आयुक्तांच्या लक्षात आणून देऊन. सदर व्यवसाय परवाना पद्धत रद्द करा अशी विनंती कुपवाड शहर व्यापारी संघटना यांच्या वतीने करण्यात आली.
यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष बिरु आस्की, उपाध्यक्ष सचिन नरदेकर, उपाध्यक्ष जगन्नाथ वाघमोडे, अमर डिडवळ, दादासो रुपनर, लक्ष्मण पाटील, प्रकाश पाटील, राजू खोत, निलेश चौगुले, अभिजीत कोल्हापुरे, प्रमोद गोंडाजे, बजरंग खरात उपस्थित होते.