डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे कुपवाड पोलिसांचे आवाहन

कुपवाड , ता.१२ : सावळी येथील विहानराजे हॉल मध्ये आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कुपवाड पोलिस ठाणे आणि सार्वजनिक मंडळांच्या बैठक सोमवार (ता.११) सायंकाळी पार पडली. डॉल्बीमुक्त गणेश उत्सव साजरा करण्याचे आवाहन कुपवाड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दीपक भांडवलकर यांनी केले. पारंपरिक वाद्याच्या गजरातच आगमन, विसर्जनाची मिरवणूक असावी. मंडळांनी विविध सामाजिक उपक्रमांवर भर द्यावा. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची गरज जाणून सार्वजनिक ठिकाणी ते बसवावेत. उत्सवादरम्यान नियमावलीचे काटेकोरपणे पालन करावे. कायदेशीर नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारू असा इशारा सहायक पोलिस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी याप्रसंगी दिला. उपनिरीक्षक विश्वजित गाडवे म्हणाले, स्वागत कमान तसेच सार्वजनिक ठिकाणी फलकांवरील फोटो व मजकूर प्रसिद्ध करण्यापूर्वी पोलिसांकडून तपासून घ्यावा. आक्षेपार्ह फोटो किंवा मजकूर आढळल्यास कायद्याचे उल्लंघन केले म्हणून संबंधितांवर गुन्हा नोंदवू , हुल्लबाजी करणाऱ्यांची गय केली जाणार नाही.

बैठकीत डॉल्बीमुक्त व पारंपरिक वाद्याने उत्सव करण्याचे निर्धार सर्वानुमते करण्यात आला. यावेळी कुपवाड शहर व उपनगरासह बामणोली, सावळी, तानंग, मानमोडी, कानडवाडी गावातील पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button