
सांगली, ता.१३: स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई. विना परवाना अग्निशस्त्र बाळगणाऱ्यास अटक केले. रोहित मच्छिद्र माने, वय २६ वर्षे, रा. करोली एम, ता. मिरज, जि. सांगली. असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्याकडून ५०,०००/- रु किंमतीच एक गावठी बनावटीचे लोखंडी अग्निशस्त्र हस्तगत केले.
पोलिसांच्या अधिक माहिती अशी की, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक, कल्पना बारवकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस अवैध अग्निशस्त्रे तसेच शस्त्रे बाळगणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
सदर सुचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक, पंकज पवार व सहा पोलीस निरीक्षक, सिकंदर वर्धन व स्टाफ यांची दोन पथके तयार केले. सपोनि/ पंकज पवार यांचे पथकातील सागर टिंगरे आणि दरिया बंडगर यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, रोहित माने, रा. करोली एम, ता. मिरज हा तरुण बिगर परवाना अग्निशस्त्र घेवून करोली फाटा येथे फिरत आहे.
दिलेल्या माहितीने त्या ठिकाणी पथक निगराणी करीत असताना एक इसम संशयितरित्या थांबलेला दिसला. त्यास ताब्यात घेत विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव रोहित मच्छिद्र माने सांगितले. त्याचे अंगझडती घेतली असता, त्याचे कंबरेला एक गावठी बनावटीचे लॉखडी अग्निशस्त्र मिळून आले. याबाबत परवाना आहे काय असे विचारले असता त्याने परवाना नसल्याचे सांगितले. अग्निशस्त्र जप्त करून आरोपी व शस्त्र पुढील तपास कामी आरोपी तासगाव पोलीसांत सोपविण्यात आले.
संशयित आरोपी विरुध्द पोहेकों / दरिबा बंडगर यांनी तासगाव पोलीसात फिर्याद दिली. रोहितवर भारतीय शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पुढील अधिक तपास तासगाव पोलीस करीत आहे.