
कुपवाड, ता.९: येथील औधोगिक वसाहतीतील वीज महावितरण जवळ झालेल्या मयूर साठे खून प्रकरणी संसयित आरोपी प्रताप राजेंद्र चव्हाण याला कुपवाड पोलिसांनी शुक्रवारी (ता.८) रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने (ता.११) ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. प्रताप चव्हाण याने बुधवारी रात्री त्याच्याच मित्राच्या डोक्यात व तोंडावर दगड घालून निर्गुण खून केला होता. खून करून स्वतः पोलीसात हजर झाला. मयुरच्या खूनाचा प्रतापवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. शुक्रवारी प्रतापला न्यायालयात केले होते. शुक्रवारी ८ ऑगस्ट ते सोमवार ११ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे