
कुपवाड, ता.५ : शिवशक्ती नगर येथे एका चाळीस वर्षीय पिडीत महिलेला शिवीगाळ करून विनयभंग केल्याची घटना सोमवारी (ता.४) रात्री दहा पस्तीसच्या सुमारास घडली. याबाबत संदीप मारुती शिंदे, रा. शिवशक्ती नगर, कुपवाड तालुका मिरज, जिल्हा सांगली याचावर कुपवाड पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर घटनेचे फिर्याद स्वता पिडीत महिलेने दिली आहे. दिलेल्या फिर्यादीवरून संशयितांवर गुन्हा नोंद करण्यात आला असून यापुढील अधिक तपास सपोनी/ दीपक भांडवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली कुपवाड पोलीस करत आहेत.